मजकुराकडे जा
Tamir

‘इंद्रधनुष्य’ युवा महोत्सवावर मुंबई विद्यापीठाने २१ व्यांदा पटकावले विजेतेपद

1 मिनिटांत वाचा
PB-SHABD

नाशिक येथे पार पडलेल्या २२ व्या राज्यस्तरीय ‘इंद्रधनुष्य’ आंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सवात मुंबई विद्यापीठाने १२४ गुणांसह एकूण २१ व्यांदा सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. ९ सुवर्ण, ८ रौप्य आणि १ कांस्य पदकांसह विद्यापीठाने आपले निर्विवाद वर्चस्व कायम राखले आहे.

Relevance : Rush

Slug : Mumbai university wins indradhanushya youth festival

Marking : Lead All

Category : Art & Culture

मुंबई, २४ नोव्हेंबर : नाशिक येथे पार पडलेल्या २२ व्या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सव ‘इंद्रधनुष्य’मध्ये मुंबई विद्यापीठाने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. स्पर्धेच्या २२ वर्षांच्या इतिहासात तब्बल २१ वेळा सर्वसाधारण विजेतेपद पटकावण्याचा बहुमान विद्यापीठाने मिळवला आहे. संगीत, साहित्य, नृत्य आणि नाट्य या चारही गटांत चमकदार कामगिरी करत मुंबई विद्यापीठाने विक्रमी १२४ गुणांसह अव्वल स्थान काबीज केले.

लोकभवनद्वारे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक येथे १९ ते २३ नोव्हेंबर २०२६ दरम्यान या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत राज्यातील २३ विद्यापीठांनी सहभाग घेतला होता. मुंबई विद्यापीठाच्या ५५ विद्यार्थ्यांच्या संघाने विविध कलाप्रकारांत आपले कौशल्य सादर करत एकूण १८ पदकांची कमाई केली.

यामध्ये भारतीय शास्त्रीय गायन, पाश्चिमात्य समूह गायन, पाश्चिमात्य एकल गायन, भारतीय शास्त्रीय नृत्य, प्रहसन, भित्तिपत्र, मातीकाम आणि इन्स्टॉलेशन या विभागांत मुंबई विद्यापीठाने ९ सुवर्ण पदके पटकावली. तसेच भारतीय समूह गायन, पाश्चिमात्य वाद्यवादन, भारतीय शास्त्रीय तालवाद्य, लोकवाद्यवृंद, भारतीय लोकनृत्य, मूकनाट्य, एकांकिका आणि रांगोळी या स्पर्धांमध्ये ८ रौप्य पदकांची कमाई केली, तर वक्तृत्व स्पर्धेत १ कांस्य पदक मिळवले.

या महोत्सवात अधिकाधिक स्पर्धांमध्ये सहभागी होऊन सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल मुंबई विद्यापीठाच्या कुमारी लक्ष्मी एस. हिला ‘गोल्डन गर्ल’, तर आर्य गोडबोले, प्रथमेश म्हात्रे आणि हर्ष परिहार यांना ‘गोल्डन बॉय’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

आणखी बातम्या