बिरसा रथासह जनजातीय गौरव पदयात्रेचा रांचीमध्ये प्रवेश, ढोल-नगाडे आणि पारंपरिक नृत्याने गूंजले राजधानी


नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील सिंगारवाडी येथील एका शेतात कापूस आणि मिरची पिकाच्या आड गांजाची बेकायदेशीर लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या कारवाईत पोलिसांनी ९ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, एका शेतकऱ्याला ताब्यात घेतले आहे.
सिंगारवाडी येथील शेतकरी दत्ता खंडू जाधव याने आपल्या शेतात कपाशी आणि मिरची पिकाची लागवड केली होती. मात्र, या आंतरपिकांच्या आड तो गांजाची शेती करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांनी शेतातून २६ गांजाची हिरवी झाडे जप्त केली. या जप्त केलेल्या झाडांचे एकूण वजन १८ किलो ४८० ग्रॅम असून, त्याची किंमत अंदाजे ९ लाख २४ हजार रुपये इतकी आहे. याप्रकरणी किनवट पोलीस ठाण्यात संबंधित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्रोत: प्रसार भारती (पीबी-शब्द)







