मुख्यमंत्र्यांनी ‘रायपुर साहित्य महोत्सव’ याचे प्रतीक चिन्ह व पोस्टरचे प्रकाशन केले

नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाणी व चारा नियोजनासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी बैठक घेऊन जास्तीत जास्त चारा लागवडीचे आवाहन केले आहे. चारा मागणी-पुरवठ्याचा समतोल राखणे आणि गरजू पशुपालकांपर्यंत चारा पोहोचवण्यासाठी यंत्रणा उभारण्यात येणार आहे.
Relevance : Priority
Slug : nashik fodder planning drought
Marking : Lead All
Category : Agriculture
नाशिक, २५ नोव्हेंबर : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात पाणी आणि चारा यांचे नियोजन करण्यात येत आहे. नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी आज चारा उत्पादक आणि विक्रेत्यांची बैठक घेऊन जास्तीत जास्त चारा लागवड करावी, असे आवाहन केले.
चारा उत्पादक शेतकरी, चारा विक्रेते, गोशाळा व्यवस्थापक, पशुपालक, सहकारी व खासगी दूध संस्थांचे प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी या सर्व घटकांशी संवाद साधून चाऱ्याची मागणी व पुरवठा यांचा समतोल राखणे, उपलब्ध चाऱ्याचे योग्य नियोजन करणे आणि गरज असलेल्या पशुपालकांपर्यंत चारा पोहोचविण्यासाठी व्यवस्था उभारण्यात येईल, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
या बैठकीला पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. सदाशिव बेडक्याळे, जिल्हा कृषी अधिकारी वरुण पाटील आणि जिल्हा दुग्ध व्यवसाय अधिकारी योगेश नागरे यांची उपस्थिती होती.
स्रोत: प्रसार भारती (पीबी-शब्द)







