मजकुराकडे जा
Tamir

महाराष्ट्राच्या हद्दीत विनापरवाना मासेमारी करणारी कर्नाटकाची हायस्पीड ट्रॉलर नौका सिंधुदुर्गात जप्त

1 मिनिटांत वाचा

महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत बेकायदा मासेमारी करणाऱ्या कर्नाटकातील मलपे बंदराच्या ‘हनुमा ध्याना’ या हायस्पीड ट्रॉलर नौकेला मत्स्यव्यवसाय विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगडसमोर समुद्रात पकडून जप्त केले आहे. आचरा किनाऱ्याजवळ विनापरवाना ट्रॉलिंग करणाऱ्या या नौकेचा पाठलाग करून तांडेलसह सात खलाशांना ताब्यात घेण्यात आले असून, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार गेल्या १५ दिवसांतील ही दुसरी कारवाई आहे.

Relevance : Rush

Slug : Illegal Fishing: Karnataka Trawler Seized off Sindhudurg Coast

Marking : Lead All

Category : Crime

सिंधुदुर्ग, १८ नोव्हेंबर: महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत बेकायदा मासेमारी करणाऱ्या कर्नाटकातील मलपे बंदराच्या ‘हनुमा ध्याना’ या हायस्पीड ट्रॉलर नौकेला मत्स्यव्यवसाय विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगडसमोरच्या समुद्रात पकडून जप्त केले आहे. १८ नोव्हेंबरला मध्यरात्री आचरा किनाऱ्यापासून ९ ते १० नॉटिकल मैल अंतरावर ही नौका कोणतीही परवानगी नसताना ट्रॉलिंग करताना आढळली.

विभागाच्या गस्ती नौकेला पाहताच या नौकेने पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र गस्ती पथकाने अत्यंततुर्कपणे पाठलाग करून तिला ताब्यात घेतले. नौकेवरील तांडेलसह सात खलाशांना ताब्यात घेण्यात आले असून, महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन कायद्यानुसार त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या कडक निर्देशानुसार गेल्या १५ दिवसांत परप्रांतीय नौकांवर करण्यात आलेली ही दुसरी कारवाई आहे.

आणखी बातम्या