मजकुराकडे जा
Tamir

डिजिटल घोेटाळ्यांमध्ये ग्राहकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी रिझर्व्ह बँकेचे नवे दिशानिर्देश जारी

1 मिनिटांत वाचा

डिजिटल घोेटाळ्यांमध्ये ग्राहकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं नवे दिशानिर्देश जारी केले आहेत. यात बँकांची जबाबदारी आणखी ठळकरित्या स्पष्ट केली आहे. सर्व बँकांसाठी रिजर्व बँकेनं जारी केलेल्या निर्देशानुसार ग्राहकाच्या खात्यासाठी सुरक्षा पडताळणीची बहुस्तरीय यंत्रणा निर्माण करण्यात अपयश, चुकीच्या माहितीच्या लॉगिन करण्यात अपयश आलं तर ग्राहकाला कळवण्यात दिरंगाई, ग्राहकानं खात्यावर लादलेल्या आर्थिक मर्यादांपेक्षा अधिक रकमेचे व्यवहार झाले तर ग्राहकांना झालेल्या नुकसानीसाठी बँक जबाबदार असेल असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. यासंदर्भातले दिशानिर्देश रिझर्व्ह बँकेनं आज जारी केले. १ जानेवारी पासून हे नियम लागू होणार आहे.

याशिवाय ग्राहकांना स्वतःच्या खात्यात काही दुर्व्यवहार झाले तर ताबडतोब पुढचे व्यवहार थांबवण्याची मुभा असेल. तसंच कार्ड, ऑनलाइन किंवा इतर व्यवहार चालू बंद करण्याची तसंच त्यावर आर्थिक मर्यादाला लावण्याची मुभा असेल. तसंच मोठ्या रकमेचे व्यवहार होत असतील तर ग्राहकाच्या विश्वासार्ह व्यक्तीकडून त्याची पडताळणी झाल्याशिवाय ते पूर्ण होणार नाही, याची पडताळणी करणारी यंत्रणा उपलब्ध करुन देणे बँकांना आवश्यक असेल. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना याचा फायदा होईल आणि फसवणुकीच्या आधारे त्यांच्या खात्यातून होणारे मोठ्या रकमेचे व्यवहार टाळता येतील. १ जुलैपासू हे दिशानिर्देश लागू होणार आहे.

आणखी बातम्या