पूर्व मुख्यमंत्री अर्जुन मुंडा यांची आई सायरा मुंडा यांचे निधन, राज्यपाल व मुख्यमंत्री यांनी शोक व्यक्त केला

वैजापूर येथील दलित तरुण रोहित पठारे हत्याकांडातील आरोपींवर 'मोक्का' अंतर्गत कठोर कारवाई करून पीडित कुटुंबाला उर्वरित आर्थिक मदत व पत्नीला शासकीय नोकरी देण्याची मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. आज पठारे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतल्यानंतर त्यांनी स्थानिक पोलिसांवरील अविश्वासाची दखल घेत सीआयडी चौकशी व कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलिसांवर कारवाईचे निर्देश दिले असून या प्रकरणी २५ आरोपींना अटक झाली आहे.
Relevance : Rush
Slug : Athawale Visits Vaijapur; Demands MCOCA
Marking : Lead All
Category : Crime
मुंबई, २३ नोव्हेंबर : वैजापूर येथील दलित तरुण रोहित पठारे यांच्या हत्याकांडातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि सराईत गुन्हेगार असलेल्या आरोपींवर 'मोक्का' कायद्यांतर्गत कारवाई करावी, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. आज त्यांनी वैजापूर येथे जाऊन पठारे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.
अशा माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आरोपींना कडक शासन झाले पाहिजे, असे आठवले यावेळी म्हणाले. अनुसूचित जातीतील व्यक्तीच्या हत्येप्रकरणी समाजकल्याण मंत्रालयातर्फे पीडित कुटुंबाला ८ लाख २५ हजार रुपयांची आर्थिक मदत आणि कुटुंबातील एका व्यक्तीला कायमस्वरूपी शासकीय नोकरी देण्याची तरतूद आहे. त्यानुसार पठारे कुटुंबीयांना साडेचार लाख रुपयांचा निधी देण्यात आला असून उर्वरित रक्कम आणि रोहित यांच्या पत्नीला शासकीय नोकरीचे नियुक्ती पत्र लवकरच दिले जाईल, अशी माहिती आठवले यांनी दिली. तसेच, रोहित यांच्या भावालाही नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
या प्रकरणाच्या तपासापासून स्थानिक पोलिसांना दूर ठेवून कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांची चौकशी करावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली. यासंदर्भात आठवले यांनी छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्याशी चर्चा करून कठोर कारवाईचे निर्देश दिले. या हत्याकांडाची सध्या सीआयडी चौकशी सुरू असून आतापर्यंत २५ आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक जाधव यांनी दिली.
स्रोत: प्रसार भारती (पीबी-शब्द)







