मजकुराकडे जा
Tamir

पंजाब विधानसभेची निवडणूक भारतीय जनता पार्टी आणि शिरोमणी अकाली दल एकत्र लढणार

1 मिनिटांत वाचा
PB-SHABD

पंजाब विधानसभेची निवडणूक भारतीय जनता पार्टी आणि शिरोमणी अकाली दल एकत्र लढणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी आज दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली. अकाली दलाचे सुखबीरसिंग बादल तसंच भाजपा अध्यक्ष नितीन नवीन यावेळी उपस्थित होते. अमित शहा यांनी बादल यांचं राष्ट्रीय लोकशाही आघाडीत स्वागत केलं.

पंजाब अमली पदार्थांच्या विळख्यातून पंजाबची मुक्तता, राष्ट्रवादी विचारसरणीला बळ देणं, पंजाबच्या तरुणांचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्यानं सोडवणं असा कार्यक्रम या युतीसमोर असेल असं नितीन नवीन यांनी सांगितलं.

आणखी बातम्या