पौड़ीच्या थलीसैंण क्षेत्राला करोडांची भेट, कपरोली इंटर कॉलेज इमारतीचे उद्घाटन


शिर्डी विमानतळावर पंचतारांकित हॉटेल उभारणीसाठी ताज समूहासोबत सामंजस्य करार
फोटो
विशेष वरिष्ठ प्रतिनिधी
मुंबई,
: शिर्डी विमानतळ परिसरातील पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्राला चालना देण्याच्या दृष्टीने पंचतारांकित हॉटेल विकसित करण्यात येणार आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी आणि दी इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड (ताज समूह) यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी मंत्रालयात सामंजस्य करार करण्यात आला. या प्रकल्पामुळे शिर्डी विमानतळ परिसरात विमान प्रवाशांसह देश-विदेशातून येणाऱ्या साईभक्तांना दर्जेदार निवास आणि आदरातिथ्य सुविधा उपलब्ध होण्यास मदत होईल, असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
या सामंजस्य करार प्रसंगी वनमंत्री गणेश नाईक, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, शिर्डी हे देशातील प्रमुख धार्मिक पर्यटनस्थळ आहे.श्री साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून मोठ्या संख्येने भाविक येथे येत असतात. शिर्डी विमानतळामुळे या भागाची हवाई कनेक्टिव्हिटी वाढली असून, विमानतळाच्या परिसरात जागतिक दर्जाच्या सुविधा विकसित होईल व पंचतारांकित हॉटेलच्या उभारणीमुळे शिर्डीच्या पर्यटन विकासाला नवी दिशा मिळेल. ताज समूहासारख्या नामांकित हॉटेल उद्योगसमूहाच्या सहभागामुळे शिर्डी विमानतळासह परिसराच्या विकासाला चालना मिळेल. या प्रकल्पांच्या माध्यमातून पर्यटनवाढीसोबतच स्थानिक अर्थव्यवस्थेला आणि रोजगारनिर्मितीलाही हातभार लागेल, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. तसेच शिर्डी विमानतळाच्या विकासामुळे शिर्डीच्या धार्मिक पर्यटनाला आणि परिसराच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार असल्याने शिर्डी विमानतळाच्या कामालाही अधिक गती द्यावी असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
यावेळी मुख्यमंत्री यांचे अतिरिक्त मुख्य सचिव लोकेश चंद्र, अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर आणि दी इंडियन हॉटेल्स कंपनी लि, ताज समूहाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
--+++-----+